चित्पावन आगाशे परिवार.,

दिनांक ८ आॅगस्ट २०१८
श्री.अजित विष्णू आगाशे.
पज्ञ्मनाभ ,प्लाॅट नं.३७, अनुपम पार्क को.आॅ.हा.सो.
कोथरुड, पुणे ४११०३८.
संपर्क:०२०-२५४५७४३७ ,९४२२५४६१३६

     


 प्रिय कुलबंधू व भगिनी यांस
 स.न.वि.वि.


सुमारे दोन वर्षापूर्वी आपल्या कुलाची वेबसाईट chitpavanagashepariwr.org.in या नांवाने सुरु केलेली आहे. संपूर्ण आगाशे कुलवृत्तांत ४५० पानाचाआहे. या सर्व पानांवरील माहिती वेबसाईटवर टाकण्यासाठी सुमारे ३०,०००/- रु.खर्च अपेक्षीत आहे. यापूर्वी आपण या कामासाठी अंदाजे ६०,०००/- रु.खर्च केलेला आहे..तसेच वेबसाईट चालू ठेवण्यासाठी सुमारे ५,०००/- रु.दरसाल खर्च येतो.

आमच्या पूर्वीच्या आवाहनाप्रमाणे प्रत्येक कुलबंधू/भगिनीने प्रत्येकी रु.५००/- देणगी व प्रत्येकी रु.१००/- वाढदिवसानिमीत्त देणगी असे एकूण रू.६००/- द्यावे असे म्हटले होते.त्याला प्रतिसाद म्हणून कुलबंधू/भगिनींनी सुमारे रू.५०,०००/-जमा केले होते.या सहकार्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

सध्या आपल्या कुलाची कार्यकारणी अस्तित्वाच नसून ती नव्याने तयार करणे,त्या कार्यकारणीच्या सभा नियमीतपणे होणे अपेक्षीत आहे.एखादी नोंदणीकृत संस्था किंवा ट्रस्ट स्थापन केल्यास त्यास अधिकृत रूप येईल असेही काही जणांचे मत होते..नवीन पिढीतील कुलबंधू/भगिनींनी पुढाकार घेऊन सहभागी होणे आवश्यक आहे.

त्या शिवाय गेल्या चार वर्षात कुलसंमेलनपण झाले नाही आहे त्यासंबंधी चर्चा व संवाद आवश्यक आहे.

प्रांसंगीक खर्चासाठी,वेबसाईट साठी येणारा खर्च व ईतर नैमीत्तीक खर्च यासाठी लागणार्या निधीसाठी सभासदांकडून/कुटुंबाकडून काही वार्षीक वर्गणी ठेवावी का याबद्दल चर्चा करावयाची आहे.

वरील सर्व बाबींचा संपूर्ण विचार करून निर्णय घेण्यासाठी तसेच काही कुलबंधूनी स्वत:हून विचारणा केल्यामुळे एक सभा रविवार दिनांक १९आॅगस्ट २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र चित्पावन संघ,टिळक रोड ,पुणे ४११०३० येथे आयोजीत केली आहे.

तरी आपण आवश्य उपस्थित राहावे ही विनंती.आपण निस्चित उपस्थित रहाणार हे खालील दूरध्वनी क्रमांकावर कळवावे म्हणजे त्याप्रमाणे व्यवस्था करता येईल.सभेनंतर भोजनाची व्यवस्था केली आहे.


कळावे.

आपले स्नेहांकीत
श्री.सुभाष गजानन आगाशे .मो.9987588428.
श्री.प्रभाकर लक्ष्मण आगाशे.मो.9049399965.
Image

प्रस्तावना

ह्या उपक्रमा बद्दल थोडेसे...

आपण पहिला "आगाशे कुलवृत्तांत" 1973 मधे व त्या नंतर 2006 मधे दुसरा कुलवृत्तांत (सुधारित आवृत्ती) प्रकाशित झला. कै. गोपाळ दाजी आगाशे ह्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले.आधुनिक तंत्रज्ञान ना चा उपयोग करून आपण सर्व कुलबांधू परस्परांच्या जास्त संपर्कात येण्यासाठी ही वेबसाइट गुढीपडवयाच्या शुभ दिनी (शुक्रवार दि. 8 एप्रिल 2016 ) सुरू करीत आहोत. कृपया सर्वांनी सहकार्य करावे. आपल्या काही सूचना असल्यास स्वागतार्ह .


Image

आमचा इतिहास

सर्वाना अभिमान वाटावा असा...

भारतातील कोंकणस्थ ब्राह्मणांच्या (चित्तपावनांच्या) सु. 320 कुलांपैकीं (कौशिक गोत्रांतील) 'आगाशे' हे कुळ आहे. दैदीप्यमान हुषारी व जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील प्राविण्य हे गुण इतर चित्तपावनांप्रमाणे 'आगाशे' कुलातील व्यक्तींचे ठायीं दिसून येतात. 'आगाशे' कुलाचा गेल्या सुमारे 250-300 वर्षांचा इतिहास त्या त्या घराण्याच्या व्यक्तींकडे टिपणे-स्वरूपांत होता तसेंच त्याचें 'छापील कुलवृत्तान्त' असे प्रकाशन नुकतेच झालेले होते.