चित्पावन आगाशे परिवार.,


     


 प्रिय कुलबंधू व भगिनी यांस ,
 स.न.वि.वि.


  आधी कळविल्याप्रमाणे दिनांक १९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र चित्पावन संघ पुणे येथे आगाशे कुलबंधूची सभा पार पडली, १२ कुलबंधू उपस्थित होते. या सभेमध्ये वेबसाईट, कुलमंडळाचे कायदेशीर अस्तित्व आणि पुढील संमेलन याविषयी चर्चा झाली. कुलमंडळाच्या कायदेशीर अस्तित्वासाठी मंडळ/ट्रस्ट स्थापन करण्याचे बद्दल उपस्थित कुलबंधुंचे एकमत झाले. या मंडळ/ट्रस्ट स्थापनेसाठी अधिक माहिती गोळा करणे गरजेचे आहे असे निश्चित करून पुढील सभेमध्ये त्यावर अधिक कार्यवाही करण्याचे ठरले.
आता दिनांक ३० सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता महाराष्ट्र चित्पावन संघ पुणे येथे खालील गोष्टी ठरविण्यासाठी भेटावयाचे आहे.

      विषयपत्रिका

१. सभासदत्व आणि सभासदत्व शुल्क या वर चर्चा व निर्णय
   - सभासदत्वाचे प्रकार - आजीव आणि वार्षिक
   - सभासदत्व शुल्क - रक्कम
२. दिनांक १९ ऑगस्ट रोजी झालेल्या सभेत ठरल्याप्रमाणे ट्रस्ट अथवा मंडळ स्थापन करण्याविषयी चर्चा
   - श्री मिलिंद आगाशे (विधिज्ञ) यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे या ट्रस्टचे/मंडळाचे उद्देश्य (ऑब्जेक्टिव्ह) ठरवणे (शब्दरचने सहित)
   - १९ ऑगस्ट ला उपस्थित असलेल्या सभासदांनी ट्रस्ट/मंडळासंबधित जी माहिती जमा केली आहे त्यावर चर्चा.
   - मंडळ/ट्रस्ट संदर्भात अधिक चर्चा
३. पुढील कुलसंमेलनाची तारीख निश्चिती संदर्भात चर्चा.
४. ऐन वेळी उपस्थित होणारे मुद्दे
   आधी उपस्थित असलेल्या बंधूंसोबतच नवीन बंधू भगिनींची उपस्थिती स्वागतार्ह आहे. कृपया उपस्थित राहू इच्छिणाऱ्या बंधू भगिनींनी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून निश्चिती कळवावी.

कळावे.

आपले स्नेहांकीत
श्री.सुभाष गजानन आगाशे .मो.9987588428.
श्री.प्रभाकर लक्ष्मण आगाशे.मो.9049399965.
Image

प्रस्तावना

ह्या उपक्रमा बद्दल थोडेसे...

आपण पहिला "आगाशे कुलवृत्तांत" 1973 मधे व त्या नंतर 2006 मधे दुसरा कुलवृत्तांत (सुधारित आवृत्ती) प्रकाशित झला. कै. गोपाळ दाजी आगाशे ह्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले.आधुनिक तंत्रज्ञान ना चा उपयोग करून आपण सर्व कुलबांधू परस्परांच्या जास्त संपर्कात येण्यासाठी ही वेबसाइट गुढीपडवयाच्या शुभ दिनी (शुक्रवार दि. 8 एप्रिल 2016 ) सुरू करीत आहोत. कृपया सर्वांनी सहकार्य करावे. आपल्या काही सूचना असल्यास स्वागतार्ह .


Image

आमचा इतिहास

सर्वाना अभिमान वाटावा असा...

भारतातील कोंकणस्थ ब्राह्मणांच्या (चित्तपावनांच्या) सु. 320 कुलांपैकीं (कौशिक गोत्रांतील) 'आगाशे' हे कुळ आहे. दैदीप्यमान हुषारी व जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील प्राविण्य हे गुण इतर चित्तपावनांप्रमाणे 'आगाशे' कुलातील व्यक्तींचे ठायीं दिसून येतात. 'आगाशे' कुलाचा गेल्या सुमारे 250-300 वर्षांचा इतिहास त्या त्या घराण्याच्या व्यक्तींकडे टिपणे-स्वरूपांत होता तसेंच त्याचें 'छापील कुलवृत्तान्त' असे प्रकाशन नुकतेच झालेले होते.